भारत

गौतम अदानी बनले जगातील दुसरे श्रीमंत उद्योगपती; मुकेश अंबानी 8 व्या स्थानी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

16 Sept :- भारतीय उद्योगपती गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची संपत्ती 154.7 अब्ज डॉलर (सुमारे 12.34 लाख कोटी रुपये) आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, गौतम अदानी यांनी फ्रा​​​​​​न्सच्या बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकून द्वितीय स्थान मिळविले आहे. फोर्ब्स अब्जाधीशांच्या सूचीमध्ये टॉप-2 मध्ये आशियाई व्यक्तीने प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

रँकिंगमध्ये गौतम अदानी आता फक्त एलन मस्क यांच्या मागे आहेत. टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांची 21.83 लाख कोटी ($273.5 अब्ज) संपत्तीसह या यादीत अव्वल स्थानावर आहेत. 12.27 लाख कोटी ($ 153.8 अब्ज) संपत्तीसह बर्नार्ड अरनॉल्ट तिसरे आणि जेफ बेझोस 11.95 लाख कोटी ($ 149.7 अब्ज) संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर आहेत.

अदानी व्यतिरिक्त रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे श्रीमंताच्या टॉप-10 यादीत स्थान मिळवणारे दुसरे भारतीय आहेत. मुकेश अंबानी हे 7.35 लाख कोटी ($92.1 अब्ज) संपत्तीसह जगातील 8 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

17 दिवसांपूर्वी गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत तिसऱ्या स्थानी आले होते. केवळ 2022 मध्ये अदानींनी त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये $78.2 अब्जची भर घातली आहे. हे कोणत्याही व्यावसायिकापेक्षा 5 पट जास्त आहे. त्यांनी फेब्रुवारीत रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना सर्वात आशियातील सर्वात श्रीमंत व्य़क्ती म्हणून मागे टाकले होते.

गौतम अदानी हे 4 एप्रिल रोजी सेंटबिलियनर्स क्लबमध्ये सामील झाले होते. 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या व्यक्तींना सेंट अब्जाधीश म्हणतात. एक वर्षापूर्वी, एप्रिल 2021 मध्ये अदानींची एकूण संपत्ती $ 57 अब्ज होती. 2021-2022 या आर्थिक वर्षात अदानीची एकूण संपत्ती जगातील सर्वात वेगाने वाढली आहे. अदानी समूहाच्या सात सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कंपन्या आहेत.

अदानी समूह त्याच्या उपकंपनी विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VPCPL) मार्फत NDTV ची प्रवर्तक कंपनी RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडचे ​​99.99% शेअर्स खरेदी करू इच्छित आहे. मात्र, काही कायदेशीर कारणांमुळे हे प्रकरण प्रलंबित आहे.