भारत

कोरोना सुद्धा बरा होऊ शकतो;भारतामधील 70 % रुग्ण कोरोनामुक्त!

घाबरू नका…काळजी घ्या!

12 Aug :- जगभरात सर्वत्रच कोरोना विषाणूचा महाभंकर कहर सुरु आहे.मात्र जगभरातील अनेक देशांच्या तुलनेत भारतात कोरोना विषाणूचा कहर सपशेल बेअसर ठरला आहे.भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची वाढती आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे आहे.मात्र भारतात कोरोनमुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा उच्चांकी आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 23 लाख पार झाली आहे. गेल्या 24 तासातही 60 हजार 963 रुग्ण सापडले. तर, आतापर्यंत 704 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून देशात एका दिवसात 60 हजारहून अधिक रुग्ण सापडत आहे. त्यामुळे आकडा पाहिला की धडकीच भरते. मात्र हेच कोरोनाग्रस्त रुग्ण कोरोनाशी दोन हात करत त्याला हरवत आहे आणि ही दिलासादायक अशी बातमी आहे.

कोरोनाला हरवणं शक्य आहे हे 70% रुग्णांनी करून दाखवलं आहे. भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 70 टक्के झालं आहे. म्हणजे इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाविरोधातील लढा यशस्वीरित्या जिंकला आहे. एकाच दिवसात 56,110 रुग्ण बरे झाले आहेत आणि आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 23 लाख पार झाली आहे. यात 6 लाख 43 हजार 948 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 46 हजार 91 रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 16 लाख 39 हजार 599 रुग्ण निरोगीही झाले आहे. यासह भारताचा रिकव्हरी रेट 70% झाला आहे.