धक्कादायक! बायको,मुलांचे 100 तुकडे त्याने दिली धमकी
5 Aug :- एकीकडे कोरोना विषाणूचा कहर आणि दुसरीकडे दिवसेंदिवस समाजात घडणाऱ्या संपतापजनक घटनेनें नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अर्थी अडचणींचा विळखा पडलेला असल्याने सर्व सामान्य नगरांचे बेहाल होत आहेत.हाताला काम नसल्याने सर्वसामान्य माणूस घर बसल्या विक्षिप्त होत चालला आहे.कदाचित यामुळेच समाजात धक्कादायक आणि विचित्र घटना घडत आहेत.अशीच एक विचित्र घटना पुणे येथील फुरसुंगीत घडली आहे.
माहेरून पैसे न आणल्यामुळे पत्नी व मुलांचे 100 तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवायची धमकी पतीने दिली. याप्रकरणी सहा जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी महिलेचा सिध्दार्थन बरोबर 200 मध्ये विवाह झाला होता. यानंतर माहेरून पैसे घेऊन आणण्यासाठी तिचा वारंवार छळ करण्यात येत होता. पतीबरोबर इतर सासरचेही मानसिक व शारीरीक तिचा छळ करत होते. पतीने तिला व मुलांना जीवे ठार मारुन तुमचे 100 तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवीन अशी धमकी दिली.
यानंतर फिर्यादीचा पती तिला व मुलांना सोडून निघून गेला. मुलांची कोणतीच जबाबदारी त्याने घेतली नाही. घटस्फोट देण्यासाठी तो सातत्याने दबाव टाकत होता.पती सिध्दार्थन व्ही.पी (वय – 42, रा.तंजावरु, तामिळनाडू), पनीर माथोर, वडीवग्गाल व्ही.पी. (वय – 63) आणि इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फुरसुंगी येथे राहाणाऱ्या 34 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणाचा तपास महिला पोलिस हवालदार बर्वे करत आहेत.