भारत

पेट्रोलिअम मंत्री कोरोनाच्या विळख्यात

4 Aug :- देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येताच मंत्रिमंडळात धावाधाव सुरू झाली आहे. यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.आताच हाती आलेल्या बातमीनुसार केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सांगितले जात आहे की त्यांच्या कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ज्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केलं होतं. चाचणी केल्यानंतर मंगळवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. धर्मेंद्र प्रधान बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत सहभागी झाले नव्हते.