भारत

कोरोना अभ्यासात आढळले नवे निष्कर्ष!

2 Aug:- जगभरात कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे.देशात कोरोनाबाधित रुग्णांचा वाढत जाणारा आकडा दिवसेंदिवस चिंताजनक होत चालला आहे.कोरोनाचा गुणाकार प्रशासनाला आणि नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे.मात्र कोरोना विषाणूचा सतत अभ्यास सुरु आहे.यावर औषध निघालेलं नाही मात्र कोरोनाविषयी महत्त्वाचं संशोधन होत असून भारतही त्यात अग्रेसर आहे.कोरोना अभ्यासात काही नवे निष्कर्ष आढळले आहेत.कोरोना अभ्यासात आढळून आलेली नवी निष्कर्ष निश्चितच सर्वांना दिलासा देणारी आहेत.

अहमदाबादमधल्या Indian Institute of Public Healthने केलेल्या अभ्यासात अनेक महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला जर कोरोना झाला तर इतर सदस्यांनाही बाधा होते असा आत्तापर्यंतचा समज होता. मात्र या समजांना या शोधाने धक्का दिला आहे.कुटुंबातला एखादा सदस्य जर कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर घरातले सर्वच सदस्य बाधित होतीलच असे नाही असं या अभ्यासात आढळून आलं आहे.अशा परिस्थितीत घरातल्या 80 ते 90 टक्के लोकांना व्हायरसची बाधा होत नाही असं आढळून आल्याचं संस्थेचे संचालक डॉ. दिलीप मावळंकर यांनी म्हटलं आहे.

अशा परिस्थितीत घरातल्या इतर लोकांमध्ये प्रतिकारशक्ती तयार होत असल्याचं या शोधात आढळून आलं आहे.संस्थेचा अभ्यास आणि या विषयांवर जगात प्रकाशित झालेले 13 रिपोर्ट्स यांचा आढाला घेऊन संस्थेने हा अहवाल तयार केला आहे.कोविडमुळे घरातल्या एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला मात्र इतर कुणालाही बाधा झाली नाही अशीही उदाहरणे असल्याचं मावळंकर यांनी सांगितलं आहे.कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला कोविडची बाधा झाली तर इतरांना बाधा होण्याची शक्यता ही फक्त 10 ते 15 टक्के एवढीच असते.

ज्या कुटुंबात पत्नी किंवा पत्नीला इन्फेक्शन झाल्यावरही दुसऱ्याचा त्याची बाधा होत नसल्याचं 45 ते 65 टक्के घटनांमध्ये आढळल्याची माहितीही या अहवालात देण्यात आली आहे.बाधित सदस्यांमुळे लहान मुलांमध्ये कोरोना पसरण्याचं प्रमाण कमी असून वृद्ध लोकांना जास्त भीती आहे असंही या अहवालात म्हटलं आहे.