महाराष्ट्रNewsPopular NewsRecent NewsTrending Newsपाऊसबीडभारतमराठवाडा

राज्यात येत्या 4 दिवसांत मुसळधार पाऊस

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

२४ सप्टेंबर | गेली काही दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे रिपरिप तर काही ठिकाणी संततधार सुरु आहे.बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात बदल होत आहेत. यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. यंदा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या श्रेणीमध्ये किंवा अधिक पाऊसाची नोंद झाली आहे.दरम्यान, पुढच्या 12 तासात हे क्षेत्र अजून तीव्र होण्याची आणि पुढील 48 तासांत ओडीशाच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार-पाच दिवस राज्यात गडगडाटासह पाऊस होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय काही ठिकणी मुसळधार पाऊस तर, काही ठिकाणी हाच पावसाचा जोर वाढणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, यावर्षी झालेल्या पावसामध्ये कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईत अतिरिक्त पाऊसाची नोंद झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, धुळे, मराठवाडा, औरंगाबाद, बीड, परभणी येथे अतिरिक्त पाऊसाच नोंद झाली आहे. याउलट विदर्भात मात्र एकाही जिल्ह्यात अतिरिक्त पाऊस झालेला नाही. गेल्या दोन आठवड्यात पाऊस पडल्यामुळे पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाला आहे. आता पुढील 4-5 दिवस राज्यात पुन्हा गडगटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कोकणसह, पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस असणार आहे. त्यामुळे या प्रदेशातील लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे, राज्यामध्ये ३० ऑगस्ट ला पावसाचा जोर वाढणार असून परभणी,नाशिक,ठाणे,रायगड सह पालघर जिल्ह्यामध्ये औरंज अलर्ट देण्यात आलाय. तर मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे, राज्यामध्ये ३० ऑगस्ट ला पावसाचा जोर वाढणार असून परभणी,नाशिक,ठाणे,रायगड सह पालघर जिल्ह्यामध्ये औरंज अलर्ट देण्यात आलाय. तर मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.