परळीचे लॉक उघडले!
परळी :- शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे परळी शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागु केली होती.अनेक दिवसांच्या संचारबंदी नंतर. जिल्हाधिकाऱ्यांनी आज (दि.20) संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे.परंतु झोन containment zone मात्र कायम राहतील असे आदेशात म्हटले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटल्याप्रमाणे, पूर्वीच्या आदेशानुसार 31 जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली होती. परंतु कोरोनाचे मीटर सुरु आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आता संपूर्ण शहरातील संचारबंदी शिथिल करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यानुसार शहरात रुग्ण आढळलेल्या 13 कॉलनीतील कंटेनमेंट झोन मात्र क असणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.चार बंदी ऊठविली असली तरी प्रत्येक नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे