बीड

ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून ‘ह्या’ नेत्याने दिला सरकारला इशारा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 June :मराठा आरक्षणाचा मुद्दा एकीकडे तापला असताना संभाजीराजे यांनी राज्य सरकारला अल्टिमेट दिला आहे.दुसरीकडे ओबीसी चे राजकीय आरक्षण आता कळीचा विषय बनला आहे याच वरून भारतीय जनता पक्षाचे नेते व विरोधी पक्षनेंतें देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सरसकट ओबीसी उमेदवार देणार असल्याचा इशारा दिला आहे.पावसाळी अधिवेशनाचा कालावधी, विधानसभा अध्यक्ष निवडणूक, ओबीसी आरक्षण आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

या भेटीनंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचाच सरकारचा डाव असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप फक्त ओबीसी उमेदवारच देईल, मग विजय किंवा पराजय जे होईल ते आम्ही पाहून घेऊ, असा आक्रमक पवित्रा फडणवीस यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, राज्य सरकारकडून या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.