Popular News

सुखद!कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी यशस्वी

12 July डोळ्यांना न दिसणाऱ्या आणि जीवघेण्या कोरोना नावाच्या सूक्ष्म विषाणूने सर्व जगाला आपल्या तालावर नाचवले आहे.जिकडे पाहावं तिकडे फक्त कोरोनाचाच कहर सुरु आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी प्रशासन आहोरात्र मेहनत घेत आहे.मात्र कोरोनाच वाढतं थैमान आटोक्यात आणणे शक्य होत नाहीए.अशा भयाण परिस्थितीमध्ये रशियातील सेशेनोव्ह विद्यापीठाने कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसीच्या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा दावा केला आहे. सर्व चाचण्या पूर्ण करणारी ही जगातली पहिली कोरोना प्रतिबंधक लस असेल. सेशेनोव्ह विद्यापीठ रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आहे.

कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसीच्या चाचण्या यशस्वी झाल्याची माहिती सेशेनोव्ह विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलॅशनल मेडिसीन आणि बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वादिम तारासोव्ह यांनी ही माहिती रशियातील अधिकृत वृत्तसंस्था स्पुटनिकला दिली आहे.या लसीच्या मानवी चाचणीसाठी नोंदणी केलेल्या स्वयंसेवकांच्या पहिल्या तुकडीला बुधवारी हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं तर दुसऱ्या तुकडीला येत्या 20 जुलैला म्हणजे पुढील सोमवारी डिस्चार्ज देण्यात येणार आहे.