News

कोरोनाची लस अंतिम टप्प्यात! ‘हा’ देश करणार तब्बल 20 कोटी व्हॅक्सिनचे उत्पादन

बीजिंग, 12 जुलै : जगभरात कोरोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे लसीचे उत्पादनही काही देशांमध्ये सुरू होत आहे. भारतातही कोरोना लसीच्या ह्युमन ट्रायलला सुरुवात झाली आहे. चीनमध्येही मोठ्या प्रमाणात चाचण्या आणि कोरोना लस तयार करण्याची तयारी सुरू आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कॅन्सिनो बायोलॉजिक्स नावाची कंपनी परदेशात लसीची मोठी चाचणी घेण्यासाठी रशिया, ब्राझील, चिली आणि सौदी अरेबियाशी चर्चा करीत आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, चीनमध्ये कोरोना संसर्ग खूप कमी झाला आहे. मात्र लसीच्या चाचण्यांसाठी अशा भागातील स्वयंसेवकांवर ट्रायल करावे लागते, जेथे कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे चीनने परदेशात लसीची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.

सध्या अमेरिकेनंतर ब्राझीलमधील कोरोनाची सर्वात जास्त प्रकरणं आहेत. अशा परिस्थितीत ब्राझील कोरोना लसच्या चाचणीसाठी योग्य ठिकाण ठरू शकते. CanSino Biologics चे सह-संस्थापक किउ डोंग्झू यांनी परदेशात चाचणीच्या योजनेबद्दल माहिती दिली आहे. डोंग्झू म्हणाले की, फेज-3 चे ट्रायल लवकरच सुरू होईल. यावेळी 40 हजार लोकांना लस डोस देण्याची तयारी सुरू आहे.

CanSino Biologicsने Ad5-nCov नावाची कोरोना लस विकसित केली आहे. Ad5-nCov ही पहिली लस आहे ज्याची चाचणी चीनमधील रुग्णांवर करण्यात आली. कंपनीचे म्हणणे आहे की Ad5-nCov लसच्या दुसर्‍या टप्प्याच्या चाचणी दरम्यान, 508 लोकांना लस देण्यात आली, ज्याचे परिणाम चांगले दिसून आले. CanSino Biologicsने असेही म्हटले आहे की कंपनी चीनमध्ये एक नवीन फॅक्टरी बनवित आहे. 2021 च्या सुरूवातीस, या लसीचे उत्पादन येथे सुरू होईल. एका वर्षात या कारखान्यातून 10 ते 20 कोटी लस डोस तयार केले जातील.

चीनमध्ये मधुमेहाच्या रुग्णांना जास्त धोका

एका अभ्यासानुसार असे म्हटले आहे की कोरोनाच्या ज्या रुग्णांमध्ये मधुमेहाच्या मागील निदानाशिवाय रक्तातील साखरेची पातळी वाढली आहे, त्यांना मृत्यूचा धोका अधिक असू शकतो. या नवीन अभ्यासानुसार, संसर्गजन्य रोगामुळे इतर गंभीर गुंतागुंत होण्याचा धोकाही संभवतो. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, पूर्वीच्या अभ्यासानुसार असे नोंदवले गेले होते की कोविड – 19 च्या रुग्णामध्ये उच्च रक्त शर्करा मृत्यूच्या जोखमीशी संबंधित आहे. ते म्हणाले की, ‘फास्टिंग ब्लड ग्लूकोज’ (एफबीजी) पातळी आणि रुग्णालयात भरती दरम्यान कोविड -19 रूग्णांच्या क्लिनिकल निष्कर्षांमधील थेट संबंध प्रस्थापित झाला नाही.