बीड

चिंताजनक! कोरोना मीटरची गती कायम

बीड ११ जुलै :- बीड जिल्ह्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे.दिवसेंदिवस वाढता कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा चिंतेचा विषय बनला आहे. बीड जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वेग चांगला वाढला असून बीड जिल्ह्यामध्ये रोज कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याचे दिसून येत आहे.आजही बीड जिल्ह्यातून सर्वाधिक 717 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीकरिता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आली होती.स्वॅबचा अहवाल आला असून 717 स्वॅबपैकी 9 स्वॅब पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.तर बीड शहरात ६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळली आहेत.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!

आज आलेली पॉझिटिव्ह अहवाल खालीलप्रमाणे
बीड ०६ :- ३२ वर्षीय महिला (रा.कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ, भिवंडीहुन आलेली),
७५ वर्षीय महिला (रा मिलीया कॉलेज जवळ, किल्ला मैदान,बीड),
३३ वर्षीय पुरुष (रा.अजिजपुरा खंदक, बीड,)
५६ वर्षीय पुरुष (रा.संभाजीनगर,बालेपीर,बीड), ३३ वर्षीय पुरुष
२८ वर्षीय पुरुष (रा.राजीव नगर, धानोरा रोड,बीड),
३० वर्षीय पुरुष (रा.पांडेगल्ली,बालीजी मंदीर जवळ,बीड

परळी- ०१ :-६५ वर्षीय पुरुष (रा.आझाद नगर, परळी,एसबीआय बँक, येथील पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),
गेवराई -०१:-२४ वर्षीय पुरुष (रा.मोमीनपुरा गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),
माजलगाव-०१ -५२ वर्षीय महिला (रा.जुना मोंढा,माजलगाव, सांगलीहुन आलेली ),