बीड

बीड- आजही धक्कादायक रिपोर्ट!

बीड 9 जुलै :- बीड जिल्ह्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे.दिवसेंदिवस वाढता कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा चिंतेचा विषय बनला आहे. संचारबंदी लागू केल्यानंतरही कोरोना संक्रमणाचा वेग चांगला वाढला असून बीड जिल्ह्यामध्ये रोज कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याचे दिसून येत आहे.आजही बीड जिल्ह्यातून सर्वाधिक 258 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीकरिता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आली होती.स्वॅबचा अहवाल आला असून 258 स्वॅबपैकी 6 स्वॅब पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.तर बीड शहरातील काळे गल्ली मधील १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!

आज ६ पॉझिटिव्ह,
आजचे स्वॅब -२६३

निगेटिव्ह – २५४, अनिर्णित – ३

०२ -अंबाजोगाई
:- ५५ वर्षीय पुरुष (देशपांडे गल्ली, फिरता व्यवसायीक)

२८ वर्षीय पुरुष (सातपुते गल्ली, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत )

०१ -धारुर

:- ७० वर्षीय महिला (अशोक नगर, पॉझिेटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

०१ -परळी

:- ६० वर्षीय पुरुष (परळी शहर, एसबीआय मोंढा मार्केट शाखा कर्मचारी)

०१ -गेवराई

:- ३४ वर्षीय पुरुष, (उमापुर)

०१ – बीड

:- ५० वर्षीय महिला (काळेगल्ली,बीड शहर)