बीड

जिल्ह्यात हळहळ! चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 Dece :- बीड तालुक्यातील गोलंग्री येथील अडीच वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून घटनास्थळी नेकनुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव पोलीस हवालदार बाबासाहेब डोंगरे दाखल झाले होते.

बीड तालुक्यातील गोलंग्री येथील अडीच वर्षीय चिमुकला पिल्या बाबुराव मोरे हा तिच्या आई सोबत शेतात गेला. होता या दरम्यान आई दुपारी २.०० वाजता काही अंतरावर असलेल्या विहिरींची मोटर चालू करण्यासाठी गेली असता तो चिमुकला देखील त्याच्या माघे माघे गेला दुर्दैवाने मातेच्या लक्षात आले नाही ती घरी आली घरी चिमुकला न दिसल्याने शोधाशोध सुरू केली असता चिमुकला आढळून आला नाही.

लोकांनी मुलगा विहिरीत पडला असावा असा अंदाज बांधला दुपारी ४ वाजे पासून रात्री ११ वाजे पर्यंत पाण्याचा उपसा केला व इतरत्रही शोध सुरू ठेवला होता. दरम्यान सर्वत्र शोध सुरू होता शेवटी रात्री ११-३० वाजता चिमुकल्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेने माहिती मिळताच नेकनुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस हवालदार बाबासाहेब डोंगरे हे घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन नेकनुरच्या स्त्री व कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास नेकनुर पोलीस करत आहे.