अभिनेता आदित्य पांचोली संतापला!
५ जुलै :- अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या आत्महत्या प्रकरणात सूरज पांचोलीचं नाव जोडलं जात असल्यानं त्याचे वडील अभिनेता आदित्य पांचोलीनं आक्षेप घेतला असून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.वृत्त माध्यमांशी बोलताना आदित्य पांचोली म्हणाला की, “लोकं आपल्या मनाच्या काहीही गोष्टी सांगतात आणि खोट्या कहाण्या सांगतात. असं करणारे थोडाही विचार करत नाहीत की, दोन मिनिटांच्या फेमसाठी ते एखाद्या व्यक्तिवर किती दबाब तयार करत आहेत.
लोकांना या गोष्टींची कल्पना नाही की, यामुळं सूरजला मानसिक आणि भावनिक किती त्रास सोसावा लागत आहे.लोक 8 वर्षांपासून जिया खान आत्महत्या प्रकरणा बाबत नॉनस्टॉप बोलत आहेत. कुणी त्याला रेपिस्ट म्हणतं तर कुणी त्याला हत्यारा म्हणतं. आता सुशांत आणि दिशा प्रकरणात देखील त्याचं नाव जोडलं जात आहे. अशाने माणूस तुटून जातो, असं आदित्य पांचोली म्हणाला.एकंदर या सर्व प्रकारावरून अभिनेता आदित्य पांचोली चांगलाच संतापला असल्याचे दिसून येत आहे.