राज्यात आजही कोरोना रुग्णांची वाढ उच्चांकी!
५ जुलै :- कोरोना…कोरोना… आणि फक्त कोरोनाच… कोरोना सर्वत्र पाहावयास मिळत आहे.प्रशासन दिवसरात्र आपली आहे तेवढी ताकद,अक्कल,युक्त्या पणाला लावत आहे.मात्र कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नाहीए.राज्यात आज 6 हजार 555 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 2 लाख 6 हजार 619 इतकी झाली आहे. आज नवीन 3 हजार 658 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.
आतापर्यंत एकूण 1 लाख 11 हजार 740 रुग्णांना बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 86 हजार 40 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात आज 151 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासनच्या चिंता वाढल्या आहेत.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!