बीड

कोरोनाला थोपवण्यासाठी पंतप्रधान मोदींचा महत्वपूर्ण सल्ला

पंतप्रधान मोदींनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

9 April :- कोरोना संसर्ग थोपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. मोदी म्हणाले-देशात लॉकडाऊनची गरज नाही, आरटीपीसीआर टेस्ट वाढवा ७० टक्के चाचण्या आरटीपीसीआर व्हाव्यात, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र, राज्ये रॅपिड अँटिजन चाचण्याच अधिक करत आहेत. अनेक राज्यांत हे प्रमाण ५०% हून अधिक आहे. भास्करच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, छत्तीसगड राज्यांनी फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत सलग आरटीपीसीआर कमी केल्या. म्हणूनच या राज्यांत संसर्ग वाढला.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

फेब्रुवारीपर्यंत देशात ६१% आरटीपीसीआर चाचण्या होत होत्या. ५० टक्केही आरटीपीसीआर न करणारी निम्मी राज्ये आहेत. १२ राज्यांत ७०%हून अधिक आरटीपीसीआर चाचण्या होत आहेत. पाच राज्यांत ५०% हून अधिक, पण निश्चित प्रमाणापेक्षा अशा कमी चाचण्या करत आहेत. १२ राज्यांत हे प्रमाण ४०%हून कमी आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीही विविध राज्यांतील चाचण्यांची ही स्थिती मान्य केली आहे.

छोटे-छोटे कंटेनमेंट झोन बनवा. त्यात सर्व लोकांची टेस्टिंग करा. त्याचा परिणाम होईल. कष्टाचे चीज होईल.राज्यांनी ७०% टेस्ट आरटीपीसीआर कराव्यात, पॉझिटिव्ह रेट ५% पेक्षा कमी होईल. लसीपेक्षा जास्त चर्चा टेस्टिंगची करा.नाइट कर्फ्यूला कोरोना कर्फ्यू म्हणा. कर्फ्यूमुळे कोरोना काळात जगतो हे लक्षात राहते. दैनंदिन जीवनावर परिणाम होत नाही. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि कोविड अॅप्रोप्रिएट बिहेविअरसह कोविड मॅनेजमेंटवरही आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे.११ ते १४ एप्रिलपर्यंत देशात लसोत्सव साजरा करा. ४५ वर्षांवरील जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी.

महाराष्ट्रात लागणार 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन?