अखेर फेअर अँड लव्हलीतून ‘फेअर’ हटवलं!
४ जुलै :-फेअर अँड लव्हली या फेअरनेस क्रीममधून अखेर फेअर हा हटवण्यात आला आहे आहे. फेअर अँड लव्हलीचं नाव आता ‘ग्लो अँड लव्हली’ असणार आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीने रिब्रँडिंग करत हा निर्णय घेतला आहे.हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीला फेअर अँड लव्हली याना नावामुळे अनेक वर्णभेदाच्या आरोपांचा सामना करावा लागला आहे.
अनेकांना या नावावर आक्षेप घेतला होता. फेअर अँड लव्हलीमधील फेअर या शब्दातून फक्त गोरेपणाशी किंवा उजळपणाशी संबंधित मर्यादित अर्थ साधला जायचा. त्यामुळे वेळोवेळी हिंदुस्थान लिव्हर लिमिटेडवर टिकाही व्हायची. त्यानंतर अखेर कंपनी आपल्या क्रीमच्या नावातून फेअर शब्द हटवलं आहे.