सुशांत कुटुंबीयांना भेटून नाना झाले भावुक
२ जुलै :- हिंदी चित्रपट सृष्टितील तरुण,लोकप्रिय,आघाडीचा अभिनेता सुशांतने आयुष्यातील वाढत्या नैराश्यामुळे स्वतःची जीवनयात्रा संपवल्याने हिंदी चित्रपट सहित सुशांतच्या चाहता वर्ग अजुनही दुःखात बुडालेला आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सुशांतच्या कुटुंबियांना पटना येथील राहत्या घरी जाऊन भेट देत दुःखात असलेल्या सुशांत कुटुंबीयांचं सांत्वन केलं.
सुशांतचं जाणं हा आमच्या सगळ्यांसाठी मोठा धक्का होता. तो अतिशय गुणी आणि उत्तम अभिनेता होता अशी प्रतिक्रिया नानांनी या भेटीनंतर दिली. त्यावेळी नाना पाटेकर भावुक झाले होते. हा धीर आणि संयमाचा काळ असल्याचंही त्यांनी सुशांतच्या कुटुंबीयांना सांगितलं. सुशांतला नक्कीच न्याय मिळेल असंही ते म्हणाले.