राजकारण

गडकरींची केंद्रात लेखी तक्रार!

३० जून :- नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारकडे लेखी तक्रार केली आहे. नितीन गडकरी यांनी तुकाराम मुंडे यांच्यासंदर्भातल पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून तुकाराम मुंडे यांनी सीईओ पद बळकावल्याचं म्हटलं आहे. नितीन गडकरी यांनी स्मार्ट सिटी घोटाळा प्रकरणात केंद्र सरकारला हे पत्र लिहिलं आहे. ज्यात ते म्हणतात, “नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सीईओ तुकाराम मुंडे यांचे वर्तन हे अवैध आणि घोटाळेबाज आहे. हे सीईओपदही त्यांनी बळकावलं आहे” या आशयाचा मजकूर या पत्रात आहे.नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार तुकाराम मुंडे यांनी स्वीकारला तेव्हाच त्यांनी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीईओपदाची जबाबदारी बेकायदा बळकावली असा आरोप गडकरींनी केला आहे. निविदा रद्द करणे, करोनाच्या काळात कंत्राटी कामगारांचे काम थांबवणे असे निर्णय तुकाराम मुंडे यांनी घेतल्याचंही या पत्रात गडकरींनी नमूद केलं आहे.