बोगस बियाणे विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होणार-उद्धव ठाकरे
२८ जून :- शेतकरी अहोरात्र कष्ट करुन बियाणं पेरतो आणि उगवत मात्र काहीच नाही. राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस सोयाबीनचे बियाणे विकून हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.बोगस बियाणे विक्री करणाऱ्या नराधमांमुळे शेतकरी संकटात सापडल्या जात आहे.या प्रकरणाची गंभीर दाखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोगस बियाणे विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.ग्रामीण भागातून बोगस बियाणांच्या तक्रारी काही प्रमाणात प्राप्त होत आहेत, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.शेतकऱ्यांना जे फसवतील त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होतील व त्यांच्याकडून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई सुद्धा वसुल केली जाईल.असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.