आरोग्यमंत्र्यांनी जिंकला कोरोनाविरोधातील लढा!
२५ जून :-जगभरात अनेक माणसं कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडली आहेत. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र कुमार जैन यांना काही दिवसांपूर्वी ताप येत होता आणि श्वास घ्यायला त्रास होता होता. त्यांना राजीव गांधी सुपर स्पेशलियटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.कोरोनाची टेस्ट केली असता आरोग्यमंत्र्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.सध्या हाती लागलेल्या माहितीनुसार समजले आहे कि दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र कुमार जैन यांनी कोरोनाविरोधातील लढा जिंकला आहे.प्लाझ्मा थेरेपीने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यानंतर काही दिवसांतच त्यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली आहे. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही दिला जाणार आहे.