Popular News

धक्कादायक!करण जोहर फक्त स्टार किड्ससोबत काम करतो!

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक,चित्रपट निर्माता कारण जोहर हा सुशांत सिँह राजपूतच्या आत्महत्येनंतर चांगलाच वादाच्या विळख्यात सापडला आहे एवढंच नाही तर करण जोहर, सलमान खान सारख्या 8 मोठ्या सेलिब्रेटीच्या विरोधात बिहारमध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे. करण जोहर फक्त स्टार किड्ससोबत काम करतो हे बऱ्याच वेळा ऐकिवात आहे.जसे कि स्टुडंट्स ऑफ द इयर, कुछ कुछ होता है,ये दिल है मुश्किल,कभी ख़ुशी कभी गम अशी अनेक चित्रपट कारण जोहर ने स्टार किडसला किंवा फिल्मी बॅग्राऊंड असलेल्याच बरोबर घेऊन तयार केली. पण आता सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर आयुष्मान खुरानाच्या पुस्तकातला एक किस्सा सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.
आयुषमान अभिनेता होण्यापूर्वी आरजे होता हे सर्वांनाच माहित आहे. आरजे असल्यामुळे त्याने एकदा करण जोहरची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये आयुषमानने अभिनेता होण्याची इच्छा करणकडे व्यक्त केली होती. तेव्हा करणने त्याच्या ऑफिसचा नंबर आयुषमानला दिला होता.करणच्या ऑफिसचा नंबर मिळाल्यावर आयुषमान फार आनंदी होता. त्याने धर्मा प्रोडक्शनमध्ये फोन केला. त्यावेळी ऑफिसमधील एका व्यक्तीने करण तेथे नसल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याने फोन केला. त्यावेळी करण कामात व्यग्र असल्याचे सांगण्यात आले होते. नंतर त्याने पुन्हा फोन केला तेव्हा त्यांनी आम्ही फक्त स्टार किड्स सोबत काम करतो आणि तुमच्यासोबत करु शकत नाही असे म्हटले असल्याचे आयुषमानने आपल्या पुस्तकात लिहिलं आहे.

– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड