सलमान खानने सुशांतला आत्महत्या करण्यास केले प्रवृत्त!कोर्टात तक्रार दाखल
सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी राहत्या घरात गळफास घेून आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं. सर्वच स्तरांतून सुशांतला श्रद्धांजली देत शोक व्यक्त होत आहे.त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला देखील सुरू झाला आहे.ऐकण्यास आश्चर्य जरी वाटत असेल तरी खरं आहे.बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध,लोकप्रिय सुपरस्टार सलमान खानने सुशांतच्या सिनेमांवर बहिष्कार टाकला.सलमानमुळे सुशांतला सिनेमे मिळणं बंद झाले आणि सुशांतला पार्ट्यांना सुद्धा सलमान खानमुळे बोलवलं जात नव्हतं आणि या सगळ्यामुळे नैराश्य येऊन सुशांतनी आत्महत्या केली.बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं त्यामध्ये ओढली गेली.सलमान खान, करण जोहर, एकता कपूर यांच्यासहह 8 जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल झाली असून येत्या 3 जुलै रोजी त्यावर सुनावणी आहे.
या तक्रारीमध्ये करण, सलमान आणि एकतासोबत आदित्य चोप्रा, साजीद नाडियाडवाला, भूषण कुमार, संजय लिला भंसाळी आणि दिग्दर्शक दिनेश यांच्या नावांचा समावेश असून सुशांतला या सगळ्यांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं असं या तक्रारीमध्ये नमूद केलं आहे.या सगळ्या बॉलिवूडकरांवर 306, 109, 504 आणि 506 ही कलमं लावली गेली आहेत तर अभिनेत्री कंगना राणावतला या केसमध्ये साक्षीदार म्हणून दाखवण्यात आलं आहे.
– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड