News

धनंजय मुंडे ला पंकजा मुंडे चा फोन

अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) राजकारणातली माया ,आणि रक्ताच्या नात्यातील माया, यामध्ये बराच फरक असतो .संकटात भाऊ सापडला? आणि बहिणीने फोन केला? यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना जेव्हा कोरणा पॉझिटिव आला. लगेच काल भाजपा नेत्या आणि त्यांच्या भगिनी पंकजाताईन फोन करून काळजी घे अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या, दोन बहीण भावा मधल सख्खे सर्वश्रुत आहे. मात्र हे संकट कधी कुणाला एकत्रित आणील आणि हदयाला भावनेचा धक्का देईल, हे न कळणार कोड आहे ,पंकजाताई च्या अंगी असलेले ममतत्व जणूकाही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा चालवणार हुबेहूब काळ साऱ्या महाराष्ट्राला दिसून आलं,
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईत गेल्यानंतर कोरोना ची लागण झाल्याचं शुक्रवारी काल तपासणीत सिद्ध झालं ,लगोलग त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे ,आपल्या भावाला लागण झाल्याचे कळताच. भाजपाच्या नेत्या पंकजाताई यांनी काल त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क करून काळजी घेण्याच्या सूचना केल्या , खरं म्हणजे सुखदुःख हे राजकारणापलीकडे असतं ,आणि अशावेळी एकमेकांची विचारपूस जर रक्ताच्या नात्यातील लोकांनी केली, तर संकटात मनाला थोडासा दिलासा मिळतो .राजकारणात बहिण-भावाचा सख्खे सर्वश्रुत आहे मात्र जेव्हा भावावर वैयक्तिक संकटाला भगिनी धावते तिथे ओसळतो माया हेच म्हणावे . पंकजाताईचं ममत्व हृदयस्थ जागं झालं .त्यांनी तातडीने धनु भाऊ ला फोन करून काळजी घेण्याची सूचना केली ,खरं म्हणजे पंकजाताई यांच्यातला ममत्व आगळा वेगळा आहे ,गोपीनाथराव मुंडे यांची आठवण काल साऱ्या महाराष्ट्रातील जनतेला झाली ,हुबेहूब साहेबांचा वारसा खऱ्या अर्थाने लेक कशी चालवते याचं हे उत्तम उदाहरण आहे,

2 thoughts on “धनंजय मुंडे ला पंकजा मुंडे चा फोन

  • BATMITACH YEND RAJKARAN AAHE KI VICHARU NAKA

  • जगताप हनुमंतराव बळीराम

    दु:ख प्रसंगी नसतात जीवाचे मावळे।
    कामी येतात फक्त पाहुणे- रावळे ।।

Comments are closed.