बीड

मसरत नगरमुळे बीड तालुका कोरोनाच्या विळख्यात

बीड- (दि.12) आज लोळदगाव आणि बाभुळखुंटा येथील पॉझिटीव्ह आढळलेली दोन्ही रुग्ण मसरत नगरच्या संपर्कातील असल्याची धक्कादायक बातमी बीडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट यांच्याकडून प्राप्त झाली आहे.हे दोन्ही रुग्ण मसरतनगरमध्ये पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांच्या क्रेनवर काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मसरतनगर मधील कोरोना रुग्णांच्या संपर्कातून आता एकूण 8 जण पॉझिटीव्ह झालेले आहेत.

 काळजी घ्या...गर्दी टाळा...स्वस्थ रहा...प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!
     दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड