महाराष्ट्रपाऊस

दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली

रायगड : जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका आदिवासी पाड्यावर मोठी दरड कोसळली असून रात्री झोपेत असतानाच अनेकांवर काळाने घाला घातला आहे. यामध्ये १२० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर मदतकार्य सुरू असून आतापर्यंत पाच ते सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच एकूण २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक मदत कार्यासाठी अनेक जण या ठिकाणी कार्यरत आहेत. मदत कार्य युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

   राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन घटनास्थळावर दाखल झाले आहेत. पहाटेच मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल झाले आहेत.