बीड

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शिक्षक आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी प्रा. विलास शिंदे यांची निवड

बीड प्रतिनिधी: आज दि 17 जुलै रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जालना रोड, बीड येथील कार्यालयात प्रा. विलास शिंदे सर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या (शिक्षक आघाडी) बीड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.या वेळी प्रा.विलास शिंदे सर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ग्रामीण भागातून येणारे मराठा समाजाचे विद्यार्थी यांची शहरी भागात होणारी पिळवणूक थांबवणे, विद्यार्थ्यांचे विविध मार्गदर्शक तसेच नौकरीविषयक शिबीर आयोजित करणे तसेच समाजातील शिक्षकांची एक जुट करून त्यांच्यावर शासन दरबारी होणारे अन्यायाविरोधात आवाज उठवणे व मराठा समाजातील व्यक्तीच्या अडी-अडचणींची सोडवणूक करण्यासाठी धावून जाणे ही मुख्य कार्ये आपणास पारपाडायची आहेत तसेच सर्व पदाघिकारींनी निवडकरुन दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करेल असे मनोगत व्यक्त केले.या वेळी नियुक्तीचे पञ देताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे मराठवाडा सरचिटणीस विनोद इंगोले, बीड जिल्हा अध्यक्ष बापुसाहेब साळुंके, कार्याध्यक्ष आदिनाथ पिंगळे, जिल्हा सरचिटणीस भागवत बादाडे, बीड जिल्हा उपाध्यक्ष सच्चिदानंद शिंदे, बीड जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर कवचट, बीड जिल्हाउपाध्यक्ष सुमंत खांडे सर, उपाध्यक्ष सुरेश गिराम, विद्यार्थी बीड जिल्हा अध्यक्ष भागवत मस्के, बीड शहर अध्यक्ष दत्ता शेळके, पाटोदा तालूका अध्यक्ष बप्पासाहेब हुले, वडवणी तालुका अध्यक्ष सुशील कदम पाटील, शिरूर तालुका अध्यक्ष बापुसाहेब मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.