बीड

बीड- चिमुकल्याला भरधाव कारने चिरडले

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 Oct :- रस्त्याच्या कडेला असलेल्या चिमुकल्याला भरधाव कारने चिरडले तालुक्यातील कडा येथे पैठण बारामती रोडवर हि घटना रविवारी रात्री दि.2 ऑक्टोंबर रोजी 9 च्या सुमारास घडली असून रुद्रा संतोष मोटे या चिमुकल्याला अहमदनगर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, कडा येथील संतोष मोटे हे हॉटेल व्यवसायिक असल्याने रात्री हॉटेल बंद करून आपल्या घराकडे पत्नी व 2 मुलांसह जात होते.काही कामानिमित्त रस्त्याच्या कडेला थांबले यावेळी अचानक धामणगाव कडून कड्याकडे येत असलेल्या भरगाव कारने एम एच 24 ए डब्ल्यू 6599 रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या रुद्राला जोरदार धडक दिली यात रुद्र गंभीर जखमी झाला अहमदनगर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला.

माहिती कळतच कडा पोलीस चौकीचे पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, अंमलदार सचिन गायकवाड,मंगेश पिसाळ,दीपक भोजे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेहावर कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करून सकाळी कडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.