बीड

बीड- कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिणे लुटले

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Sept :- पुणे येथे चाललेल्या वाहनाला अडवून सहा दरोडेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवत रोख रक्कमेसह महिलांच्या अंगावरील दागिणे असा एकूण 72 हजार रूपयाचा ऐवज जबरदस्तीने लुटल्याची घटना पहाटे केज-मांजरसुंबा रस्त्यावरील कोरेगाव पाटी येथे घडली. लुटारू व दरोडेखोरांनी काळ्या कपड्याने आपले चेहरे बांधले होते. या घटनेने केज-मांजरसुंबा रस्त्यावर भितीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी सहा दरोडेखोराविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

धनाजी किसनराव भोसले हे पुणे जिल्ह्यातील कुरूळी ता.खेड येथे स्थायिक आहेत. त्यांच्या चुलत्याचे निधन झाल्याने ते कुटूंब व नातेवाईकासह अंत्यविधीसाठी नांदेड जिल्ह्यातील खदगाव येथे आले होते. रक्षा सावडण्याचा विधी उरकून ते परत पुणे येथे पिकअप क्र. एम.एच.12 टी.व्ही.3905 ने जात होते. केज-मांजरसुंबा महामार्गावर कोरेगाव पाटीजवळ पाठीमागून एक कार आली. त्या गाडीने ओव्हरटेक करून पिकअपला गाडी आडवी लावून आतील काळ्या कपड्यान तोंड बांधलेले सहा दरोडेखोर उतरले. त्यांच्या हातात धारदार कोयते होते. या कोयत्याच्या मुठीने एकास मारहाण करून दहशत निर्माण केली.

पिकअपची चावी काढून प्रवाशांना धमकावण्यात आले. धनाजी भोसले व शंकर भोसले यांच्याजवळील 8370 रोख रक्कम तसेच ड्रायव्हींग लायसन, एटीएम, पॅन कार्ड, आधार कार्ड, क्रेडिट कार्ड असे साहित्य जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर दोन महिलांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिणे लुटले. एका महिलेचे 36 हजाराचे तर दुसर्‍या महिलेचे 8 हजाराचे दागिणे होते. एकूण 72,370 रूपयाच ऐवज या दरोडेखोरांनी जबरदस्तीने लुटला.

या पिकअपमध्ये धनाजी भोसले, दत्ता भोसले, शंकर भोसले, शंकर यादव, समर्थ यादव, महादेव टेकाळे, राम नखाते, विमलताई घाटगे, अनुसया भोसले, अंबिका परशुराम यादव इतके जण होते. या घटनेनंतर संबंधीतांनी केज पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. याप्रकरणी अज्ञात सहा दरोडेखोराविरोधात कलम 395 भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.