भारत

सरकारची दिवाळीपूर्वी भेट! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Sept :- केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावेळी सरकारने मार्चमध्ये DA वाढवला होता. तो 1 जानेवारी 2022 पासून लागू झाला. मार्चमध्ये, सरकारने डीएमध्ये 3% वाढ केली होती. म्हणजेच ती 31% वरून 34% केली होती. आता 4% ने वाढल्यानंतर ते 38% होईल. सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यास देशातील 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला 3 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. आता या योजनेचा लाभ डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. यापूर्वी ही योजना सप्टेंबर 2022 रोजी संपत होती. केंद्राच्या या निर्णयामुळे देशातील 81 कोटींहून अधिक जनतेला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. आता देशातील गरजूंना डिसेंबर 2022 पर्यंत मोफत रेशन मिळत राहील.

कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन असताना मार्च 2020 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली.
सुरुवातीला ही योजना एप्रिल ते जून 2020 पर्यंत होती. त्यानंतर ते नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढवून लागू करण्यात आले.
त्यानंतरही सरकारने या योजनेचा पाठपुरावा सुरू ठेवला. गरीब कल्याण योजनेंतर्गत 81 कोटी लोकांना दरमहा एक किलो हरभरा सोबत 5 किलो गहू किंवा तांदूळ दिले जाते. लोकांना हे धान्य रेशन दुकानातून मिळते.
यांना मिळतो योजनेचा लाभ

या योजनेअंतर्गत, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत ओळखल्या गेलेल्या लोकांना सरकार मोफत रेशन देते. NFSA ने मोफत रेशन मिळवणाऱ्यांच्या यादीत 80 कोटी शिधापत्रिकाधारकांचा समावेश केला आहे. या योजनेंतर्गत मिळणारे मोफत रेशन हे कार्डधारकांना रेशन दुकानातून मिळणाऱ्या अनुदानित धान्यापेक्षा जास्त आहे.

महागाई भत्ता हा पगाराचा भाग आहे. ही कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराची निश्चित टक्केवारी असते. देशातील महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देते. ती वेळोवेळी वाढवली जाते. निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळतो.