महाराष्ट्रभारत

ऐन सणासुदीत गॅस दरवाढीचा भडका उडणार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 Sept :- जनतेच्या खिशावरचा बोजा वाढणार आहे. आता नागरिकांना गॅस महागाईचा फटका बसण्याची चिन्ह आहेत. या आठवड्यात होणार्‍या पुनरावलोकनानंतर नैसर्गिक वायूच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नैसर्गिक वायूचा वापर वाहनांसाठी वीज, खते आणि सीएनजी निर्मितीसाठी केला जातो. यामुळे नैसर्गिक वायूचे दर वाढल्याने सीएनजीचे दरही वाढणार आहेत.

देशात तयार होणार्‍या गॅसची किंमत सरकार ठरवते. सरकारला 1 ऑक्टोबरला गॅसच्या दरात पुढील सुधारणा करायची आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या जुन्या फील्डमधून तयार होणार्‍या गॅससाठी द्यावा लागणारा दर प्रति युनिट 6.1 डॉलरवरून 9 डॉलर प्रति युनिट जाण्याची शक्यता आहे. उर्जेच्या किमतीत अलिकडच्या वाढीमध्ये भर पडल्यानंतर कंपनी दर वाढवण्याची शक्यता आहे.

सरकार दर सहा महिन्यांनी किंमत निश्चित करते. हा दर नियमित क्षेत्रासाठी आतापर्यंतचा सर्वोच्च दर असेल. बेंचमार्क आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये वाढ होत असताना एप्रिल 2019 पासून नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली ही तिसरी वाढ असेल. सरकार दर सहा महिन्यांनी (1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर) गॅसची किंमत ठरवते.

अमेरिका, कॅनडा आणि रशिया यांसारख्या गॅस सरप्लस देशांच्या मागील एक वर्षाच्या दरांच्या आधारे ही किंमत तिमाही अंतराने निर्धारित केली जाते. अशा स्थितीत 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 2023 या कालावधीसाठी गॅसची किंमत जुलै 2021 ते जून 2022 पर्यंतच्या किमतीच्या आधारे निश्चित केली जाईल. त्यावेळी गॅसच्या किमती अतिशय उच्च पातळीवर होत्या.