बीड

बीड- हिटरची टाकी फुटली; उकळते पाणी अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 Sept :- हिटरची टाकी फुटून उकळते पाणी महिलेच्या अंगावर पडल्याने यामध्ये सदरील महिला गंभीररित्या भाजली. तिला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. हि घटना पिंपळगाव याठिकाणी घडली.

उषा रंजित सुरवसे (31, रा. पिंपळगाव ता. माजलगाव) या महिलेच्या अंगावर 19 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास हिटरचे पाणी अंगावर पडले होते. सदरील महिला झोपेत होती. अंगावर पाणी पडल्याने ती भाजल्याने तिला उपचारार्थ अंबाजोगाईच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज सकाळी सदरील महिलेचा मृत्यू झाला.