महाराष्ट्र

धक्कादायक प्रकार! ‘सेक्स तंत्र’ नावाने ऑनलाइन बुकिंग; व्हायरल जाहिरातीमुळे खळबळ

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

16 Sept :- राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात नवरात्र उत्सवाच्या पवित्र सणानिमित्ताने तरुणाईला लैंगिक प्रशिक्षण देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशन’ने सेक्स तंत्र नावाने ऑनलाईन बुकिंग सुरु केल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात एक जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

जाहीरातीनुसार 1 ते 3 ऑक्टोबर रोजी असे तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात तरुण-तरुणींचा सहभाग असणार आहे. सध्या हा मेसेज सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.

ध्यानधारणा आणि कामसूत्रातील लैंगिक क्रिया या संदर्भात या शिबिरात प्रशिक्षण दिले जाणार आहे. यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने ‘सेक्स तंत्र’ या नावाने तीन दिवसांचा हा कोर्स आयोजित करण्यात आल्याची ही जाहिरात आहे. ही जाहिरात सोशल मीडियावर कुणी व्हायरल केली, याचा शोध पुणे सायबर पोलीस घेत आहेत. पुणे पोलिस सत्यम शिवम फाउंडेशनच्या सूत्रधारापर्यंत पोहोचणार का?, असा प्रश्न आता पुणेकर करत आहेत.

यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने पुण्यातील कॅम्प परिसरात तीन दिवसांचा सेक्स तंत्र या नावाच्या एका कोर्सचे आयोजन करण्यात आहे. या कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून तीन दिवसांसाठी प्रत्येकी 15 हजार रुपये आकारले जाणार आहेत. ‘सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशन’ या संस्थेतर्फे या कोर्सचे आयोजन करण्यात आल्याचे जाहिरातीमध्ये सांगितले आहे.

या जाहिरातीबरोबर एक क्यूआर कोडदेखील देण्यात आला असून त्याद्वारे आयोजकांशी संपर्क साधता येणार आहे. या सेक्स तंत्र कोर्सला पोलिसांनी परवानगी दिली आहे का? हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, पुणे सायबर पोलिसांनी याची चौकशी सुरु केली आहे. या कोर्सच्या आयोजकांची माहिती पोलीस शोधत आहेत. या जाहिरातीत देण्यात आलेल्या नंबरवरुन आयोजकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. त्याचबरोबर ही जाहिरात कोणी सोशल मीडियावर पसरवली याचाही सायबर पोलिस शोध घेत आहेत.