मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
1 Sept :- हवामान विभागाने विदर्भातील दहा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, 1 व 2 सप्टेंबरला कोकण व मध्य महाराष्ट्रातही मध्यम पावसाचा अंदाज आहे. बुधवारी बुलडाणा, औरंगाबाद, महाबळेश्वर, पुणे, वेंगुर्ला, बारामतीत मध्यम तर नाशिकमध्येही हलका पाऊस झाला.
मराठवाड्यासह विदर्भातील नागपूर, बुलडाणा, वाशिम, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज आहे. राज्यात बुधवारी विविध शहरांतील पाऊस : बुलडाणा 61, औरंगाबाद 17, महाबळेश्वर 10, वेंगुर्ला 2, पुणे 5, बारामती 13 (आकडे मिलिमीटरमध्ये)