महाराष्ट्र

शहाजी बापूंवर पेडणेकरांची सडकून टीका! म्हणाल्या, “आता काय तुमच्या बायकोला…”

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Sept :- राज्यातील सत्तांतर नाट्यादरम्यान “काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल” या डॉयलॉगमुळे प्रसिद्ध झालेले सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील सध्या एका नवीन वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. खूप गरिबीत जगतोय, किती दिवसांपासून बायकोला साडी देखील घेऊ शकलो नाही, या त्यांच्या विधानावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

शहाजी पाटलांच्या बायकोला आता लोकांनी साडी घेऊन द्यायची का? असा मिश्किल टोला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. “बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी” असं म्हणत पेडणेकर यांनी पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

लोकांना पटेल एवढंच खोटं बोलावं, असा सल्ला देखील पाटलांना पेडणेकर यांनी दिला आहे. गाणं व्हायरल झाल्यानंतर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे शहाजी बापू पाटील सातव्या आसमानवर पोहोचले आहोत. त्यांना लवकरच जनता खाली आणेल, असेही पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

सांगोल्यामध्ये प्रशासनाकडून नुकताच दारुचा साठा जप्त करण्यात आला. यावरुनही पेडणेकर यांनी पाटलांवर निशाना साधला आहे. दरम्यान, शहाजी पाटलांविरोधात माळशिरसमध्ये युवासेनेकडून फलकबाजी करण्यात आली आहे. ‘काय दारू काय चकणा, काय ते ५० खोके समदं कसं ओके,’ बापू तुमच्यासाठी मातोश्रीवर नोकरी भेटेल,”अशा आशयाची फलकं सध्या शहरात झळकताना दिसत आहेत.

गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील बेस्ट बसेसवर भाजपाकडून करण्यात आलेल्या जाहिरातीवर देखील पेडणेकर यांनी सडकून टीका केली आहे. “बॅनरबाजी करुन प्रेम किंवा मताधिक्य मिळवता येत नाही. त्यासाठी काम करावं लागतं, जे आदित्य ठाकरेंनी केलं आहे”, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.