वाचा, ED च्या कोठडीत राऊतांना कशाकशाची मुभा असणार?
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
1 Aug :- पत्रा चाळ घोटाळ्यात अटक करण्यात आलेले शिवसेना नेते संजय राऊत यांना सोमवारी पीएमएलए कोर्टाने 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. मात्र, ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची कोठडी मागितली होती. ईडीने न्यायालयात सांगितले की, आम्ही 3 वेळा समन्स पाठवले, पण राऊत मुद्दाम हजर झाले नाहीत. या प्रकरणाशी संबंधित पुराव्यांमध्येही छेडछाड करण्यात आली आहे.
ईडीच्या कोठडीतही संजय राऊतांना घरचं जेवण, औषधे मिळणार.
सकाळी साडेआठ ते साडेनऊ या काळात राऊतांचे वकील त्यांना भेटू शकतात.
रात्री साडे दहानंतर संजय राऊतांची चौकशी करता येणार नाही.
या अटकेविरोधातील निदर्शने पाहता न्यायालयाच्या आवारात 200 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ईडी कार्यालयाबाहेर 100 पोलीस तैनात करण्यात आले.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याला रात्री उशिरा 12 वाजता मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. साडेसहा तासांच्या चौकशीनंतर बुधवारी ईडीने ही कारवाई केली. राऊत रविवारी सायंकाळी 5.30 वाजता ईडी कार्यालयात पोहोचले होते. राऊतच्या अटकेनंतर त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आल्याचे सांगितले. अटकेबाबत आम्हाला कोणताही कागद देण्यात आलेला नाही. संजय राऊत यांना भाजप घाबरतो, म्हणून अटक करण्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला.