निर्वस्त्र करून शिक्षिकेला मारहाण
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
दि. 25 जुलै :- पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूरमध्ये एका शाळेतील शिक्षिका मुलीवर रागविल्याने मुलीच्या नातेवाईकांनी शिक्षिकेला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी व समाजबांधवांनी संतप्त होत शाळेत घुसून शिक्षिकेला मारहाण केल्याचे प्रकरण आता समोर आल्याने समाजातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मारहाणीमुळे शाळेत मोठा गोंधळ उडाला होता. घटनास्थळावर पोलीस दाखल झाले. त्यांनी परिस्थिती हाताळून 4 जणांना अटक केली असून 35 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणारे लोक हे अल्पसंख्याक समाजातील असल्याचे सांगीतले जात आहे. ही घटना हिली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमोहिनी प्रतापचंद्र शाळेतील आहे. सदर विद्यार्थीनी ही इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे.
तीन दिवसांपूर्वी शाळेत शिक्षिकेने मुलीला कोणत्या तरी कारणावरून राग करून शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली. दुसऱ्या दिवशी मुलीचे कुटुंबीय त्यांच्या काही मित्रांसह शाळेत दाखल झाले. शाळेतील शिक्षकांसह सदर शिक्षिकेवर गैरवर्तन केले. विरोध झाल्यावर शिक्षिकेला निवस्त्र करून बेदम मारहाण केली. तेव्हा शाळेत मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल दाखल झाले. त्यांनी परिस्थिती हाताळली.
महिला शिक्षिकेसोबत झालेल्या गैरवर्तणुकीमुळे स्थानिकांमध्ये संताप दिसून येत होता. लोकांनी रास्ता रोको करून निषेध केला. दोषींवर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी पीडित महिला शिक्षिकेने विद्यार्थिनीला शिस्तीत ठेवण्यासाठी तिचे कान ओढून तिच्यावर रागविल्याचे सांगीतले, असा प्रसंग माझ्यासोबत यापूर्वी कधीच घडला नव्हता. या प्रकरणामुळे मला प्रचंड भीती निर्माण झाली आहे, असे मतही पिडीत शिक्षिकेने सांगीतले.
भाजप खा.सुकांता मजुमदार यांनी रविवारी संबंधित ठिकाणी भेट दिली. महिला शिक्षिकेला मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच खासदार मजुमदार यांनी पोलीसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एवढे मोठे प्रकरण घडूनही पोलीसांनी गुन्हा दाखल केला नाही.
मजुमदार म्हणाले की, मीही शिक्षक होतो. अनेक विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी फटके देखील दिले आहे. शिक्षकासाठी विद्यार्थी हा त्याचा एकमेव मार्गदर्शन असतो. या ठिकाणी शिक्षिकेने विद्यार्थीनीच्या कान पकडले. तर तिचा हिजाब उतरविला गेला, असा आरोप करून शिक्षिकेस बेदम मारहाण करण्यात आली. अतिशय क्षुल्लक कारणावरून शिक्षिकेला मारहाण करणे चुकीचे आहे. मला आश्चर्य वाटते की, मुख्यध्यापकांनी तक्रार केली नाही. तर पोलीसांनी देखील गुन्हा दाखल करण्याची हिंमत दाखविली नाही. लोकांनी आंदोलन करून रस्ता रोको केल्यावर पोलीसांनी अखेर कारवाई केली.