महाराष्ट्र

संभाजीनगरचे पुन्हा औरंगाबाद आणि धाराशिवचे उस्मानाबाद

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 July :- काही दिवसांपूर्वी गुगल मॅपवर औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे इंग्रजीत दाखवण्यात येत होते. त्यानंतर गुगलने यु टर्न घेतला असून, पुन्हा संभाजीनगर काढून औरंगाबाद असे नाव कायम ठेवले आहे. तर धाराशिवचे उस्मानाबाद केले आहे. गुगलने काही दिवसांसाठी हे नाव का बदलले होते, आणि आता पुन्हा का बदल केला, अशा उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेला नामांतराचा निर्णय अयोग्य असल्याचे म्हणत शिंदे सरकारने पुन्हा आपल्या कॅबिनेटमध्ये शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला. राज्य सरकारने या दोन शहरांचा नामांतराचा निर्णय घेतला असून, मात्र, उद्याप केंद्राने याला मंजुरी दिलेली नाही.

राज्यात संत्तातर झाल्यानंतर शिंदे सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर केले. त्यानूसार, औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यात आले, गुगलने देखील आपल्या मॅपवर या दोन्ही शहरांचे नावे बदलली होती, याला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवत गुगलकडून स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर आज पुन्हा गुगलने आपल्या मॅपवर गुन्हा औरंगाबाद असे टाकले आहे. गुगलने हे पाऊल नेमके का उचले होते याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.