भारत

राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान सुरू:PM मोदी, शहा आणि योगींनी केले मतदान

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

18 July :- देशाच्या पंधराव्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांकडून यशवंत सिन्हा हे उमेदवार आहेत. 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, पक्षांच्या पाठिंब्यानुसार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

राज्यांच्या विधानसभा आणि संसद भवनामध्ये मतदान होणार आहे. बॅलेट पेपरद्वारे मतदान होणार आहे. खासदारांना हिरवा, तर आमदारांना गुलाबी रंगाच्या मतपत्रिका मिळणार आहेत. गोपनीयता राखण्यासाठी, मतपत्रिका अनुक्रमांकाऐवजी रँडमली दिल्या जातील.

बंगालमध्ये क्रॉस व्होटिंग होऊ नये म्हणून भाजपने आधी आमदारांना कोलकात्यातील हॉटेलमध्ये ठेवले, नंतर सर्वांना विधानसभेत आणून मतदान केले. क्रॉस व्होटिंग रोखण्याची जबाबदारी पक्षाने शुभेंदू अधिकारी, मनोज तिग्गा आणि स्वपन मजुमदार यांच्यावर सोपवली आहे. येथे, यूपीमधील समाजवादी पक्षाचे आमदारही क्रॉस व्होटिंग करू शकतात.