महाराष्ट्र

दोघेच महाराष्ट्राचे मालक; अजित पवारांची टोलेबाजी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

14 July :- आम्ही सत्तेत असताना 50 टक्के इंधन कर कपात करण्याची मागणी भाजपने घेतली होती. मात्र, आता त्यांचे सरकार असून, त्यांनी 50 टक्के इंधन कर कपात का केली नाही. 50 टक्के कपात केली असती तर पेट्रोल 17-18 रुपयांनी आणि डिझेल 11 रुपयांनी स्वस्त झाले असते, पण तसे झाले नाही. विरोधी पक्षात असताना वेगळी मागणी करायची आणि आता सत्तेत असताना निर्णय घेण्याची वेळ आल्यावर पळवाट काढायची आता हे दोघेच महाराष्ट्राचे मालक झाले, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली राज्य सरकारवर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मंत्रिमंडळ बैठक झाली. बैठकीत लोकहिताचे अनेक निर्णय घेतल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पेट्रोल 5 रुपये, तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त मिळेल, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, सरकार बदलल्यानंतर आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय असा केविलवाणा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, या निर्णयाचा नागरिकांवर फार काही परिणाम होणार नाही.

आजच्या कॅबिनेटमध्ये शिंदे यांनी आणखी एक निर्णय घेतला असून, सरपंच, नगराध्यक्षांची निवड थेट लोकांमधून होणार आहे. त्याबरोबरच बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते म्हणाले की, मार्केट कमिटीच्या निवडणुकीत सगळ्या शेतकऱ्यांनी मतदान करायचे म्हणजे त्याला आमदारकीचे स्वरुप येणार, असे बदल शिंदे सरकारने केले आहे. त्या पाठीमागचे कारण ज्या वेळी पुढचे पावसाळी अधिवेशन सुरू होईल, त्यावेळी मी सांगेल.

शिंदे सरकारची दुसरी कॅबिनेट मीटिंग आज झाली असून, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनाला संचालक नेमला जातो मात्र, उद्याप तो संचालक देखील नेमण्यात आलेला नाही. मदत पुर्नवसन हे खाते अत्यंत महत्वाचे आहे, राज्यात अनेकदा महापूर, घरांची पडझड, ढगफुटी अशा अनेक घटना घडतात. अशावेळी मदत व पुर्नवसन खात्याला सचिव असणे अत्यंत गरज आहे.