महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय माझ्यासाठी आश्चर्यचा धक्का होता

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 July :- मी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करत होतो. त्यावेळी माझ्यासोबत बसलेल्या तिघांना कोणाला मुख्यमंत्री बनवले जाणार हे माहीत होते. मी मुख्यमंत्री होणार नाही याची मला आधीच माहिती देण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्यांतर मला उपमुख्यमंत्री करण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासाठी आश्चर्यचा धक्का होता, अशी कबुली राज्याचे नवनिर्वाचित उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आमचे सरकार आता कोणत्याही परिस्थितीत पडणार नाही. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. त्याचा मंत्रिमंडळ विस्तारावर काहीही परिणाम होणार नाही. राजकीय कारणांमुळे आपण मंत्रिमंडळाचा विस्तार थोडा मागे-पुढे करू शकतो. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने व्हिप लागू होत नाही, त्याच प्रकारे विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप लागू होत नाही. यासंदर्भात न्यायालयाचे अनेक निर्णय आहेत. मात्र, याबाबत कायदेतज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. असेही फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी व्हीप जारी करून त्यांच्या उमेदवाराला मतदान करण्यास सांगितले. मात्र, दोन्ही गटांनी एकमेकांच्या व्हिपचे पालन केले नाही आणि दोघांनी विधानसभेत स्वतःच्या व्हिपचे उल्लंघन केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळ कधी होणार, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आजपर्यंत कोणतीही चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात किती लोक घ्यावे लागतात? आमच्या (भाजप) पक्षाचे किती जण घ्यायचे आहेत? त्यावर अजून चर्चा झालेली नाही. खातेवाटपाचा फॉर्म्युला काय असेल, असे विचारले असता? ते म्हणाले की, यावर अजून चर्चाच झाली नाही, त्यामुळे मी काही सांगू शकत नाही!

आमदारांचे दोन टप्पे जरी आपण केले तरी सर्व आमदारांना एकाच वेळी शपथ दिली जाणार नाही. 18 जुलैपूर्वी सर्व मंत्र्यांची नियुक्ती होणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वी झाले पाहिजे. कारण अधिवेशनात आम्ही दोघेच (मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री) मंत्री आहोत, त्यामुळे हे मला योग्य वाटत नाही.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, राजकारण अशा घटना घडतात. मी उद्धव ठाकरे यांना सरप्राईज करायला गेलो मात्र, ऐनवेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने मी देखील आश्चर्यचकित झालो. मी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करत होतो. त्यावेळी माझ्यासोबत बसलेल्या तिघांना कोणाला मुख्यमंत्री बनवले जाणार आहे, हे माहीत होते. मी मुख्यमंत्री होणार नाही हे मला आधीच माहीत होते, असे चौफेर उत्तर फडणवीसांनी यावेळी दिले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवल्यानंतर मला उपमुख्यमंत्री करण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासाठी आश्चर्यकारक होता. मात्र, यासोबतच आमच्या कोअर कमिटीतील चार-पाच लोकांशिवाय कोणालाच काय होणार आहे, हे माहीत नव्हते, असेही फडणवीस म्हणाले.