पंतप्रधान मोदींसमोर मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना ‘एक्स्चेंज ऑफर’
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
दि. 15 जून :- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंगळवारी मुंबईमध्ये ‘जल भूषण’ या राज्यपालांच्या कार्यालय व निवासस्थान असलेल्या इमारतीचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त बऱ्याच दिवसांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एकाच मंचावर दिसून आले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजभवन येथे क्रांती गाथा या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांना समर्पित भूमिगत दालनाचे उदघाटन करण्यात आले. ही ब्रिटिशकालीन भुयारे २०१६ मध्ये आढळून आली होती. दारूगोळा व अन्य सामग्री साठवण्यासाठी त्याचा उपयोग होत होता. इतिहासकार आणि लेखक डॉ. विक्रम संपत यांच्या संकल्पनेतून क्रांती गाथा दालन तयार करण्यात आले असूनच याच दोन वास्तूंचे उद्घाटन मोदींच्या हस्ते काल पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यासारखे मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांसमोर भाषण करताना उद्धव ठाकरेंनी राज्यपालांच्या नव्या घराचं कौतुक करत एक खास ऑफर दिली.
भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या नव्या निवासस्थानाचं कौतुक केलं. ‘या वास्तूचं जसं नुतनीकरण झालं, तसं जल भूषण जिकडे आपल्या राज्यपालांचं निवास्सथान आहे,’ असं म्हणत उद्धव यांनी राज्यपालांकडे पाहून पुढे, “फार मोठं आणि खूप चांगलं घर बांधलंय तुम्ही” असं म्हटलं. यानंतर सभागृहामध्ये एकच हसू फुटलं. पुढे उद्धव यांनी, “एक्स्चेंज करायचं का?” असंही मिश्कीलपणे विचारलं. यानंतरही सभागृहातील उपस्थित मान्यवर हसू लागले. पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजभवनातील दालन हे प्रेरणादायी तीर्थस्थळच ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.