क्राईमबीड

केज-अंबाजोगाई रोडवर पुन्हा अपघात; एक गंभीर जखमी तर एकाचा जागीच मृत्यू

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

दि.14 जून :- केज-अंबाजोगाई रोडवर सोनीजवळा पाटी जवळ च्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ एसटी बस आणि मोटार सायकलीच्या झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १४ जून मंगळवार रोजी रात्री ८:०० वा. च्या दरम्यान केज येथे केज-अंबाजोगाई रोडवर सोनिजवळा पाटी जवळील जलशुद्धीकरण केंद्रा जवळ लातूर कडून येणाऱ्या एका एसटी बस क्र. (एम एच-२०/बी एल-१९२४) आणि मोटार सायकलचा क्र. (एम एच-२५/ एस-१९२४)अपघात झाला.

अपघातात एका २५ वर्षीय युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून एक युवक गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त मोटार सायकलही कळंब तालुक्यातील तेरखेडा येथील एकाची असून त्याने ही मोटार सायकल विक्री केली आहे. अपघातातील मयत व जखमींची अद्याप ओळख पटलेली नाही.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्यासह महादेव बहिरवाळ, हनुमंत गायकवाड आणि संतोष गित्ते यांच्या पथकाने घटनास्थळी हजर होत अपघातातील जखमी आणि मयत याना उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल केले.