भारत

राहुल गांधींची 4 तास चौकशी ED चौकशी; 72 लाखांचे कर्जही डोक्यावर

14 Jun :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणातील मनी लाँड्रिंगविषयी ईडी चौकशी सुरू आहे. हे सुमारे 2 हजार कोटींहून अधिकचे प्रकरण आहे. काँग्रेसने आपल्या पार्टी फंडातून या वृत्तपत्राला 90 कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज दिले होते.

ईडी राहुल गांधींची त्यांच्या संपत्तीविषयी चौकशी करत आहे. 2019 च्या निवडणुकीपूर्वी राहुल यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 15 कोटी 88 लाख रुपयांची संपत्ती व 72 लाख रुपयांचे कर्ज असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, आज आम्ही राहुल यांच्या संपत्तीची माहिती तुम्हाला देत आहोत…

2019 च्या प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल यांच्याकडे 15 कोटी 88 लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. 2014 मध्ये त्यांची संपत्ती 9.4 कोटी होती. राहुल यांच्यावर 72 लाखांचे कर्ज असून त्यांच्याकडे स्वतःची कारही नाही.
राहुल यांच्याकडे 5 कोटी 80 लाख 58 हजार 799 रुपयांची जंगम व 10 कोटी 8 लाख 18 हजार 284 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे 40 हजारांची रोकड आहे. तसेच विविध बँकांत 17 लाख 93 हजार रुपये जमा आहेत. त्यांनी रोखे, शेअर्स, म्युच्युअल फंडात 5 कोटी 19 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. राहुल यांचा दिल्लीतील सुलतानपूर गावात वारसाहक्काने मिळालेल्या शेतीत वाटा आहे. त्यांच्याकडे 333.3 ग्रॅम सोने आहे. 2017-18 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न 1 कोटी 11 लाख 85 हजार 570 होते.

तुमची मालमत्ता कुठे आहे? परदेशात काही मालमत्ता आहे का? जर होय, कुठे आणि किती?
एजेएलमध्ये तुमची भूमिका काय होती, तुम्ही यंग इंडियात कसे सहभागी झालात?
यंग इंडियाचे संचालक कसे झालात? कंपनी कधी-केवढ्यात स्थापन केली?
यंग इंडियाला एजेएलचा ताबा घेता येईल का?
AJL चे दायित्व काढून टाकण्यासाठी कोणाच्या निर्णयावर पैसे दिले गेले?
तुम्ही AJL मध्ये 50 लाख रुपये किमतीच्या शेअर्सचे पैसे कसे दिले?
तुमचा वाटा किती होता? तुम्ही शेअर्स कसे आणि केवढ्यात विकत घेतले? यासाठी पैसे कुठून आणला?
AJL चे 90.9 कोटी रुपयांची देणदारी माफ का करण्यात आली?
शेअर्स स्वत:च्या नावाने घेतले. पण, नॅशनल हेराल्डला काँग्रेसने 90.9 कोटी रुपये दिले?
टेकओव्हरसाठी जुन्या भागधारकांच्या बैठकीचे कार्यवृत्त? बैठक बोलावली नाही तर कारण काय?
बुडणारे जहाज असतानाही काँग्रेस पक्षाने एजेएलला कर्ज का दिले?
नॅशनल हेराल्डचे पुनरुज्जीवन करण्यामागचा हेतू काय होता?