क्राईमबीड

जुगार अड्ड्यावर पंकज कुमावत यांचा छापा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 जून :- राजकारण म्हणचे जुगार आहे असे बोलले जाते पण केज मध्ये आजी-माजी नगरसेवक आणि माजी सभापती हे जुगार खेळताना सापडले आहेत. मात्र नाव मोठं लक्षण खोटं अशी त्यांची अवस्था असून सर्वांच्याकडे मिळून अंगझडतीत; त्यांच्याकडे अवघे ९ हजार रु. मिळाले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि. ५ जून रविवार रोजी केज येथील बाजार समिती जवळील कन्हैया ट्रेंड्स मध्ये जुगार सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना एका गुप्त खबऱ्या मार्फत मिळताच त्यांच्या आदेशाने पथकातील पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, पोलीस जमादार बालाजी दराडे , संभाजी दराडे, अनिल मंदे, संतोष गित्ते यांच्या पथकाने दुपारी २:३० वा. कन्हैय्या ट्रेडर्सवर धाड टाकली. तेथे विद्यमान नगरसेवक रामचंद्र विठठलराव गुंड, माजी पंचायत समिती सभापती बालासाहेब रामराव जाधव, माजी नगरसेवक शेषराव लक्ष्मण कसबे, नगरसेवकांचे चिरंजीव सुशिल सज्जन अंधारे, निरंजन अशोकराव बोबडे, लिंबाजी शंकराराव शिंदे आणि मनोज पांडुरंग घोरपडे हे सातजण झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असताना आढळून आले. त्यांची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता सात जुगाऱ्या कडून ९ हजार ३०० रु. रक्कम मिळून आली.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशावरून पोलीस नाईक दिलीप गित्ते यांनी केज पोलीस ठाण्यात नगरसेवक रामचंद्र विठठलराव गुंड, माजी पंचायत समिती सभापती बालासाहेब रामराव जाधव, माजी नगरसेवक शेषराव लक्ष्मण कसबे, नगरसेवकांचे चिरंजीव सुशिल सज्जन अंधारे, निरंजन अशोकराव बोबडे, लिंबाजी शंकराराव शिंदे आणि मनोज पांडुरंग घोरपडे या सात जणांच्या विरुद्ध गु. र. नं. २१८/२०२२ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे पुढील तपास करीत आहेत.