बीड

बीड पंचायत समितीची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड

आज (दि.५) रोजी सायंकाळी एका अज्ञात व्यक्तीने बीड पंचायत समिती मध्ये घुसून टेबल,खुर्च्या,काचा फोडल्या आहेत आणि संगणकाची तोडफोड करून सर्व सामान अस्थव्यस्थ फेकून दिले आहे.हि तोडफोड कोण्ही केली? हि तोडफोड का केली? याचे कारण अजून उमगलेलं नाही.
बीड पंचायत समितील तोडफोडीच्या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर ठाण्यातील पोनी सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि काळे, पो नि भागवत सानप,विष्णू चव्हाण यांनी पंचायत समिती कडे धाव घेऊन घडलेल्या घटनेची पाहणी केली आहे. अज्ञात व्यक्तीने केलेल्या या तोडफोडी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.