शैक्षणिकभारत

नीट पीजी परिक्षेचा निकाल जाहीर

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

01 जून :- आज राष्ट्रीय परीक्षा मंडळाने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-पीजी म्हणजेच नीट पीजी 2022 चा निकाल जाहीर केला आहे. अवघ्या 10 दिवसांत निकाल जाहीर केल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसचे कौतुक केले आहे. नीट पीजी 2022 चा निकाल जाहीर करताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. परिक्षा दिलेले उमेदवार त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर पाहू शकतात.

नीट पीजी 2022 कट ऑफ देखील जारी करण्यात आला आहे. यासाठीची गुणवत्ता यादी राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाईल. उमेदवार 8 जून 2022 रोजी किंवा त्यानंतर nbe.edu.in वरून वैयक्तिक स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतील. राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा-पोस्ट ग्रॅज्युएट-२०२२ नीट पीजी 21 मे रोजी 849 केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेत एकूण 1,82,318 उमेदवार बसले होते.