बीड

कुंडलिक खांडे यांना मारहाण झाल्याच्या आरोपात तथ्य नाही!

30 मे :- बीड तालुक्यातील नागापूर फाटा या ठिकाणी जल जीवन मिशन च्या टेंडर वरून बाचाबाची आणि वाद झाल्याचं केसापुरी परभणी चे चेअरमन विठ्ठल शिंदे यांनी सांगितले होते. यात माजी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना मारहाण झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. मात्र या आरोपात काही तथ्य नाही असं शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी सांगितला असून ज्या ठिकाणी वाद झाला तो वाद सोडवण्यासाठी मी गेलो होतो असंही त्यांनी सांगितलं यामुळे कुंडलिक खांडे यांना मारहाण झाली नसून वाद सोडवण्यासाठी गेले होते. यापूर्वी झुंजार नेता ने विठ्ठल शिंदे यांच्या मारहाणीच्या आरोपावरून बातमी छापली होती मात्र यात काही तथ्य आढळून येत नाही.