मंकीपॉक्सवर ICMR चा इशारा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावाच्याअनुषंगाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने इशारा जारी केला आहे. परिषदेच्या मते, या आजाराचा छोट्या मुलांना सर्वाधिक गंभीर धोका आहे. यामुळे त्याच्या लक्षणांवर नजर ठेवावी लागेल. सद्यस्थितीत भारतात मंकीपॉक्सच्या एकाही रुग्णाची पुष्टी झाली नाही. पण, सरकार याविषयी हायअलर्टवर आहे. दुसरीकडे, भारतीय प्रायव्हेट हेल्थ डिव्हाइस कंपनी ट्रिव्हिट्रॉन हेल्थकेअरने मंकीपॉक्सच्या चाचणीसाठी एक RT-PCR टेस्ट किट तयार केली आहे. ही कीट एका तासाच्या आत आपला अहवाल देईल.
समलैंगिक पुरुषांसाठी धोकादायक मानल्या जाणाऱ्या मंकीपॉक्सचा जगात झपाट्याने प्रसार सुरू आहे. शुक्रवारी अर्जेंटिनातही या आजाराचा पहिला रुग्ण आढळला. हा रुग्ण नुकताच स्पेनवरुन परतला होता. देशात व्हायरसचा अन्य एक संशयितही आढळला आहे. तत्पूर्वी, मंगळवारी पश्चिम आफ्रिकेतून यूएईत परतलेल्या एका महिलेलाही मंकीपॉक्सची लागण झाल्याची पुष्टी झाली.
मंकीपॉक्सच्या लक्षणांत संपूर्ण शरीरावर पू भरलेले पुरळ, ताप, लिम्फ नोड्स सुजणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा यांचा समावेश आहे.