क्रीडादेश विदेश

क्रिकेटपटू च्या निधनाने क्रिकेटविश्व हादरले

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 May :- ऑस्ट्रेलियन क्रिकेटपट्टू अँड्र्यू सायमंड्स चा अपघातात मृत्यू झाल्याने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व असणाऱ्या कालावधीत म्हणजेच १९९७ ते २००७ दरम्यान सायमंड्स हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग होता.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू झालाय. ४६ वर्षीय सायमंड्सचा ऑस्ट्रेलियामध्ये एका कार अपघातात मृत्यू झाला. समोर आलेल्या माहितीनुसार क्विन्सलॅण्डमधील अलिक रिव्हर ब्रीज येथील हार्वे रेंज रोडवर सायमंडच्या गाडीचा अपघात झाला.
गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून बाजूला जाऊन उलटल्याची माहिती पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात दिलीय. सायमंड्सचा मृत्यू हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांसाठी या वर्षातील तिसरा धक्का आहे. यापूर्वी शेन वॉर्न आणि रॉड मार्श या दोघांचाही अशाच प्रकारे आकस्मिक मृत्यू झालाय.

थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा ; पुरुष संघाचा पराक्रम! ; प्रथमच अंतिम फेरीत मुसंडी; डेन्मार्कवर ३-२ अशी मात
सायमंड्सच्या मृत्यूनंतर अनेक दिग्गजांनी ट्विटरवरुन त्याला श्रद्धांजली अर्पण केलीय. ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू जॉनस निल गिलेस्पीने सायमंड्सच्या मृत्यूसंदर्भात धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिलीय. “धक्कादायक बातमी आहे. आम्ही सर्वचजण तुला कायमच मीस करु मित्रा,” असं गिलेस्पीने म्हटलंय. तर दुसरीकडे अॅडम गिलक्रीस्टने, “हे खरोखर वेदनादायी आहे,” अशी प्रतिक्रिया दिलीय.

ऑस्ट्रेलियामधील वरिष्ठ क्रिकेट रिपोर्टर अशणाऱ्या रॉबर्ट कारडॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार टाउनस्वीलीपासून ५० किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला. क्विन्सलॅण्ड पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकानुसार अपघात झाला तेव्हा सायमंड्स हा गाडीमध्ये एकटा प्रवास करत होता. स्थानिक वेळेनुसार रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला.अपघाताची माहिती मिळताच वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झालं पण त्यांना सायमंड्सला वाचवण्यात यश आलं नाही. सायमंड्सने ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी सामने खेळले आहेत.त्यानंतर सायमंड्स हा फॉक्स क्रिकेटसाठी समालोचक म्हणून काम करत होता.